
सावंतवाडी : येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि उपवडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने उपवडे गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या वैद्यकिय सेवाभावामुळे उपवडेवासिय भारावून गेले. कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात दुर्गमस्थानी असलेल्या उपवडे गावात हे पहिलेच आरोग्य शिबिर झाले.
उपवडे शाळा नं १ येथे घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्द्घाटन धारगळ येथील आयुष हॉस्पिटलच्या स्त्रि रोग प्रसुती तज्ञ डॉ अंकिता मसुरकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपवडे सरपंच अजित परब, उपसरपंच सदानंद गवस, गावा प्रमुख बाळकृष्ण दळवी, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे डॉ प्रविणकुमार ठाकरे,
हृदयरोग तज्ञ डॉ नंदादीप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील, स्त्रि रोग तज्ञ डॉ अंकिता मसुरकर, डॉ राहुल गवाणकर, माणगांवच्या परब हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ चेतन परब, डॉ स्वप्निल परब, निवृत्त शिक्षक विश्राम दळवी, स्वप्निल पाटकर, संतोष राऊळ, ज्येष्ठ नागरिक रामचंद्र कदम, निवृत्त शिक्षक विश्राम दळवी, माजी सैनिक शंकर भरड, अरविंद राणे, वनिता सावंत आदी उपस्थित होते.
या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, हृदयरोग तज्ञ डॉ नंदादीप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील, स्त्रि रोग तज्ञ डॉ अंकिता मसुरकर, डॉ सौ स्नेहल परब, डॉ प्रविणकुमार ठाकरे, डॉ राहुल गवाणकर, डॉ स्वप्निल परब, डॉ चेतन परब यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात लॅब टेक्निशियन प्रशांत कवठणकर यांनी
रुग्णांची ब्लड शुगरची तपासणी केली. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या वैद्यकिय शिबिरात गरजू रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. या शिबिराचे नियोजन सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते भार्गवराम शिरोडकर, गुरुनाथ राऊळ, संतोष नाईक, भगवान रेडकर, दीपक गावकर, नितीन गोंडगिरे, सिद्धेश मणेरीकर यांनी केले. यावेळी दुर्गम उपवडे गावात निःशुल्क निदान व चिकित्सा सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपवडे सरपंच अजित परब, स्वप्निल पाटकर, संतोष राऊळ यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या आरोग्य सेवेच्या उपक्रमाचे कौतुक करीत सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.