मोफत महाआरोग्य शिबीर ; दीपक केसरकर मित्रमंडळाच आयोजन

Edited by: विनायक गावस
Published on: July 13, 2023 23:07 PM
views 115  views

सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना सावंतवाडी आणि दिपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अरिहंत हॉस्पिटल बेळगाव यांच्या सौजन्याने तज्ञांकडून हदयरोग, मेंदू विकार, मुत्ररोगसंबंधी विकार, किडनी विकार, पोटाचे विकार, जनरल मेडीसिन आदी आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. रविवारी २३ जुलैला सकाळी १० वा. उपजिल्हा रुग्णालयात शिबीर आयोजित करण्यात आले आहे. याचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे.

तर डॉ. राजेश नवांगुळ यांच्या यशराज हॉस्पिटलच्या सहकार्यांन महिलांसाठी विशेष गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे निदान व मार्गदर्शन होणार आहे. गर्भाशयाच्या मुखास जखमा होणे, अंगावरुन पांढरे जाणे, अनियमीत रक्तस्त्राव, पोटदुखी, वजन कमी होणे, पाठदुखी इ. यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास मोफत पॅपस्मीयर तपासणी करुन पुढील मार्गदर्शन केले जाईल, शनिवार दि. २२ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता यशराज हॉस्पिटल, जुना बांदा नाक्याजवळ, सावंतवाडी येथे हे शिबिर होणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे.


अधिक माहितीसाठी खेमराज उर्फ बाबू कुडतरकर - ९९२२११७४६४ श्रीमती आनारोजीन लोबो ९४२१२६५२०९, अॅड. सौ. निता सावंत कविटकर - ९४२३३०२००७, सौ. भारती मोरे - ७५८८८९८८८२, श्री. गजानन नाटेकर - ९४२२५९६२३५ यांच्याशी संपर्क साधावा.