सिंधुदुर्गची आरोग्य व्यवस्था व्हेंटीलेटरवर | उपरकरांचं टीकास्त्र

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 03, 2023 18:22 PM
views 113  views

सिंधुदुर्ग : नांदेड मध्ये जी आरोग्य दुर्घटना झाली तशीच अवस्था सिंधुदुर्गात होण्याची वेळ आली आहे. पालकमंत्री लोकप्रतिनिधी आपला दवाखान्याची घोषणा करतात. उदघाटने करतात. पण तिथे आवश्यक औषध पुरवठा होतो काय ? शासकीय रुग्णालयात सुद्धा 41 डॉक्टर पदे रिक्त आहेत. वर्ग 3 आणि वर्ग 4 ची पदे भरली गेली नाहीत. स्थानिक आमदार वैभव नाईक आणि नितेश राणे यांनी राज्यातील विषयावर बोलण्यापेक्षा मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष द्यावे अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.

10 अधिपरीचारिका स्टाफ मंजूर असतानाही केवळ 3 अधिपरीचारिका देवगड ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवा देत आहेत. अति ताणा मुळे देवगड ला अधिपरीचारिका संपावर जाणार म्हणतात ही लज्जास्पद आहे. जिल्ह्याचे सुपुत्र केंद्रीयमंत्री आणि राज्यात मंत्री असूनही जिल्ह्याची आरोग्यसेवा सुधारू शकत नाहीत. आता विरोधी पक्षात असलेले खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी सत्तेत असताना 1600 कर्मचाऱ्यांच्या भरतीचे काय झाले ? शासकीय वैद्यकीय कॉलेज घाईगडबडीत सुरू करून  एमबीबीएस शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जात आहे. सिंधुदुर्गातील जनता आता लोकप्रतिनिधींच्या फसव्या आश्वासनाला बळी पडणार नाही.