दोडामार्ग तहसीलच्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात

Edited by: लवू परब
Published on: June 07, 2025 16:01 PM
views 195  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याचे मुख्यालंय म्हणजेच तहसील इमारतीच्या आवारात गेले कित्तेक वर्षे आणि कित्तेक महिन्यापासुन अपघात ग्रस्त व पोलिसांनी जप्त केलेली वाहने सडत आहेत. तसेच परिसरातील वाढलेली झाडे झूडपे, इमारती समोर पडलेले डपके या सर्व कारणामुळे तालुक्याचे मुख्यालंय सद्या चर्चेत आले आहे. मुख्यालय इमारती मध्ये असणारी कार्यालये आणि इमारत व सभोवतालची साफसफाई करण्यासाठी तुतू मैमै सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे तालुका मुख्यालंय इमारत व आजू बाजूचा परिसर स्वच्छ कोणी करायचा? हा पडलेला प्रश्न तहसीलदार सोडवतीला का? हे पाहणे औत्सुक्याचे बनले आहे.

        दोडामार्ग तालुक्याची निर्मिती हाऊन 26 वर्षे झाली. आणि तालुक्याची मुख्यालंय इमारत म्हणजेच तहसीलदार इमारत झाली. या इमारत मध्ये प्रत्येक विभागाच्या कार्यालयाने म्हणजेच पोलीस, कृषी, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, ट्रेजरी या सर्वानी 

आपली जागा ताब्यात घेतली आणि कार्यालये सुरवात झाली. आणि विषय आला स्वच्छतेचा प्रत्येक विभागाने जागा ताब्यात घेतली मात्र त्या कार्यालयाची , बाथरूम आणि सभोवतालच्या परिसराची स्वछता नेमकी करायची कोणी? हा प्रश्न बरीच वर्षे पडून होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी इथले तहसीलदार अमोल पोवार यांनी इमारत मध्ये असलेल्या प्रत्येक कार्यालयाची बैठक घेऊन सक्त सूचना केल्या होत्या की प्रत्येक कार्यालयाने आपल्या कार्यालया समोरील स्वछता तसेच इथले बाथरूम ची स्वछता ठेवावी अशा सूचना केल्या होत्या. काही दिवस स्वछता केली गेली मात्र तहसीलदार पोवार काही महिन्या पासून रजेवर गेल्यामुळे पुन्हा ये रे माझ्या मागल्या असा पुन्हा कारभार सुरु झाला. इमारती मध्ये अस्वछता, बाथरूमची दुरावस्था यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पावसाळा सुरु आहे कार्यालय ठिकाणी आलेल्या नागरिकांनी पावसात बाथरूमला जायच कुठे पुरुष मंडळी पावसात कुठेतरी उघड्यावर जाऊ शकतात मात्र महिला वर्गाने करायचं काय? अशा प्रकारे अनेक प्रश्न या तालुका मुख्यालंय इमारती मध्ये उपस्थित होत आहेत. सां. बां विभागाने नादुरुस्त असलेले शौचालय बाथरून दुरुस्त करून ते नागरिकांच्या सेवेत आणणे महत्वाचे होते.

तालुक्याची  मुख्यालय इमारत नवीन असताना पाच वर्षातच ती नादुरुस्थ झाल्याचे तालुका वासियांकडून बोलले जात आहे. मग एवढा गैर कारभार सुरु असताना शासन याकडे गाभीर्याने का बघत नाही ?  स्वछता, डागडुजी, वाहन पार्किंग  या सर्व समस्या कधी सुटतील? असा प्रश्न आता सर्वसामन्य जनते मधून विचारला जाता आहे.

जप्त केलेल्या वाहनांचे काय?

मुख्यालय इमारतीच्या आतील स्वछतेचा विचार करताना इमारत आवारातील स्वछतेचा विषय ऐरणीवर आला आहे. अपघात ग्रस्त वाहने, पोलिसांनी जप्त केलेली वाहने, महसूल ने जप्त केलेली वाहने ही सद्या तहसील इमारतीच्या आवारात सडत आहेत. ही उभी करून ठेवलेली वाहने बिदिक्कत पणे या दोन्ही विभागांनी ठेवल्याने इमारतीची सोभा ही कुठेतरी हरवत चाललेली दिसत आहे. या वाहनांमुळे आजूबाजूचा परिसर देखील झाडा झूडपानी वेढलेला आहे. सडत असलेल्या वाहनांचे पुढे काय? त्याची व्हीलेवाट कशी होणार, लिलाव होणार की स्क्रॅप होणार? हे दोन्ही विभागांनी जातीनीशी लक्ष घालून या अपघात ग्रस्त व जप्त केलेल्या वाहनांची व्हिलेवाट लावावी.

वाहन पार्किंगची जबाबदारी कोणाची?

मुख्यालंय इमारत मध्ये प्रत्येक विभागाची कार्यालये असल्यामुळे या ठिकाणी अनेक वाहने येजा करतात. या ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे येणारा प्रत्येक जण मनाला वाटेल तिथे गाडी पार्क करतो. त्यामुळे इतर वाहना चालक किंवा येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने बेशिस्त पणे उभी करावी लागतात.  त्यामुळे स्वछतेचा विषय हे प्रत्येक कार्यालयाचा झाला तर वाहन पार्किंग व्यवस्था नेमकी करायची कोणी? हा प्रश्न इथेले प्रभारी तहसीलदार सोडवतील काय? असा प्रश्न इथले कर्मचारी तसेच सर्वसामान्य जनते मधून विचारला जात आहे.

कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात.

मुख्यालय इमारत अस्वछता आणि सभोवतालचा परिसरातील वाढलेली झाडे झूडपे, वाहने, डपके यामध्ये पावसाचे पाणी सचत आहे. या सचकेल्या पाण्यात डासांची संख्या वाहल्यामुळे या इमारती मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे आरोग्य धोक्यात असल्याचे इथल्या कर्मचारी वर्गाकडून बोलले जात आहे. त्यामुळे आतील स्वच्छते बरोबर सभोवतालच्या परिसराची स्वछता करणे गरजेचे आहे.