आरोग्यमंत्र्यांचे खुलासे आश्चर्यकारक : डॉ. जयेंद्र परुळेकर

Edited by: विनायक गावस
Published on: December 14, 2023 20:06 PM
views 147  views

सावंतवाडी : आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलेले खुलासे आश्चर्य व्यक्त करणारे होते. राज्यासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. हा व्हेंटिलेटर बंद होईल अशी परिस्थिती आहे‌. ठाण्यापासून मराठवाड्यापर्यंत दिवसाला २४ च्यावर बळी गेलेत. हे आरोग्य यंत्रणेला लाज वाटाव अस आहे. आरोग्यमंत्र्यांनी खर तर राजीनामा द्यायला हवा होता. हाफकीन कोण ? अस विचारणारे हे आरोग्यमंत्री आहेत. ते डॉक्टर लावतात. त्यामुळे ते कुठली पीएचडी लावतात हे पहाव लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे आमदार व सावंतवाडीचे दीपक केसरकर यांनी तानाजी सावंत यांना भेटून सगळी आश्वासन मिळालीत अस भासवल आहे. या आश्वासनावर रूग्ण जगणार आहेत का ? असा सवाल उबाठाचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केलाय. 

आरोग्य महासंचालक, उपमहासंचालक ही पद रिक्त आहेत. जिल्ह्यातील डॉक्टर, स्पेशालिस्ट ही पद रिक्त आहेत. १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयांना फिजीशीयन नाहीत. फक्त दोन फिजिनीयन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहेत. स्व.भाईसाहेब सावंत आरोग्यमंत्री असताना ३८ आरोग्य केंद्र त्यांनी वाढवली. आजही तेवढीच आहेत एकही वाढलेलं नाही. ही आरोग्य केंद्र बीएमएस डॉक्टर चालवत आहेत. एकाकाळी किमान एक एमबीबीएस डॉक्टर आरोग्य केंद्रांत असायचा. डॉक्टर येत नाहीत हे धादांत खोट आहे. डॉक्टर येतील पण त्यांची रहायची व्यवस्था काय ? त्यांच्या कामाची वेळ काय ? कोणता माणूस २४ तास काम करतो ? दिवसभर काम केल्यानंतर रात्री थोडा उशीर झाला तर त्यांना टार्गेट केल जात. आपल्या जिल्ह्यात मारहाणीचे प्रकार सध्या होत नाहीत हे जनतेच्या संयमशीतेच लक्षण आहे. आपली जनता सुज्ञ व सुजाण आहे. आरोग्याच्या दुरावस्थेस राज्यकर्तेच आहे. आठ-आठ तासांची ड्युटी असणारे तीन डॉक्टर रूग्णालयात असायला हवेत. तर तिथली ओपीडी वाढेल. चांगले उपचार तिथे मिळतील. सर्व पद भरलेली पाहिजे. आपल्याकडे भरलेल्या पदांपेक्षा रिक्त पदे जास्त आहेत. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. 

तर दीपक केसरकर हे कामापुरते मामा आहेत. उलटतपासणीत बाळासाहेब असताना शिवसेनेत हुकुमशाही होती, लोकशाही नव्हती अशी टिप्पणी केली आहे. हे २०१४ ला सेनेत आलेत. बाळासाहेबांच २०१२ ला निधन झाल. पुढील काळात हे दीपक केसरकर भाजपच्या नेत्यांवर टीका करताना दिसतील असा आरोप त्यांनी केला.