68 रिक्षा चालक-मालकांना आरोग्य किट

ठाकरे शिवसेनेचा उपक्रम
Edited by: विनायक गांवस
Published on: July 24, 2025 16:44 PM
views 100  views

सावंतवाडी : प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असणारे तीन आसनी रिक्षा चालक यांचे आरोग्य उत्तम राहावे, या दृष्टीने त्यांना प्राथमिक उपचारासाठी लागणारे आरोग्य किट त्यांच्याजवळ असणे हे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टिकोनातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानक जवळील सुमारे 68 रिक्षा चालक-मालक यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते आरोग्य किट भेट देण्यात आले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रम केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज रिक्षा चालकांचा गौरव करण्यात आला. सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानक जवळील रिक्षा चालकांना आरोग्य किट, भेटवस्तू देऊन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही कधी ही हाक मारा निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष तुम्हाला सहकार्य करेल, असे आश्वासन श्री राऊळ यांनी दिले.

यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, अशोक धुरी, संदीप पांढरे, विनोद काजरेकर, सुनील गावडे, फिलिप्स रोड्रिक्स, गुणाजी गावडे नम्रता झारापकर, बाबू गावडे, प्रशांत बुगडे, शरद जाधव, नेमळे उपसरपंच राऊळ, मंथन गवस, रोहन मल्हार, संदीप भाईत, संजय धुरी, सचिन मुळीक, रिक्षा संघटना व सहा आसनी  रिक्षा संघटना चालक-मालक, शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.