ध्वनी प्रदूषणाचा आरोग्यावर परिणाम : सुनील जाधव

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 27, 2025 15:02 PM
views 358  views

देवगड  :  ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ या दोघांवर परिणाम होतो असे प्रतिपादन जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी केले.

“ध्वनी प्रदूषण“ या विषयावर बोलताना सुनील जाधव पुढे म्हणाले की, ध्वनी प्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक ताण वाढतो.मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक होतो. त्याला झोप लागत नाही. म्हणून त्याचे मानसिक संतुलन बिघडते. माणूस वेडापिसा होतो. ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व हृदयाला आमंत्रण मिळते म्हणून विद्यार्थ्यानी भविष्यात ध्वनी प्रदूषण टाळावे असे आवाहन गोगटे प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी केले.

ध्वनी प्रदूषणाची गंभीरता लक्षात घेऊन प्रशालेत “ध्वनी प्रदूषणाचे दुष्परीणाम“ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेचे उत्तम आयोजन व नियोजन मोहन सनगाळे, मंगेश गिरकर यांनी केले.