
कणकवली : दिवंगत सुमन आणि मोहन सामंत यांच्या स्मरणाथव शुभा मुडगल आणि दीपा मुडगल यांनी कॅन्सर पेशंट्स संस्थेच्या सहकार्याने येथील संजीवनी हॉस्पिटल येथे पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात घसा, कान, नाक, वैद्यकीय तपासणी, शस्त्रक्रियेसंबंधी तपासणी, कॅन्सरबाबत तपासणी करण्यात आली. याशिवाय उच्च रक्तदाब, मधुमेह तपासणी करण्यात आली. डॉ. सतीश काणेकर, डॉ. रचना मेहरा, डॉ. संजय डिलिआॅन, डॉ. विना बोरकर यांनी पोलिसांची तपासणी केली. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ. विद्याधर तायशेटे व रुग्णातील कर्मचाºयांचे सहकार्य लाभले.