सावंतवाडी न. प. च्या महिला सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

Edited by: विनायक गांवस
Published on: March 10, 2026 15:41 PM
views 18  views

सावंतवाडी : महिला दिनाचे औचित्य साधून नगरपरिषदेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सावंतवाडी न.प. रूग्णालयात हा उपक्रम राबविण्यात आला. महिलांचे आरोग्य उत्तम राहून सावंतवाडी शहर स्वछ व सुंदर राहण्यास मदत होण्याच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 


यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, उपसभापती सुनिता पेडणेकर, नगरसेविका दुलारी रांगणेकर, ॲड‌. सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक आदींसह नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.