उपरकरांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर | उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by:
Published on: April 13, 2025 17:13 PM
views 131  views

सावंतवाडी : माजी आमदार व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत काझी शहाबुद्दीन सभागृह येथे आयोजित केलेल्या भव्य आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा जवळपास १५० हून अधिक जणानी लाभ घेतला. यात अत्याधुनिक व ईसिजी,जर्मन स्कॅनिंग पद्धतीने तपासणी करण्यात आली. 

या भव्य शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत द्वीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उबाठा शिवसेना पक्षाचे नेते माजी आम. जीजी उपरकर यांनी शिबिर स्थळी भेट दिली. त्यांचे सावंतवाडी उबाठा शिवसेनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी  उपजिल्हा संघटक चंद्रकांत कासार, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, तालुकाप्रमुख माईकल डिसोजा,शहर प्रमुख शैलेश गौंवडळकर, निशांत तोरसकर,युवा पदाधिकारी आशिष सुभेदार, प्रवीण गवस,भारती कासार, श्री ठाकूर श्री परब आदीं मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

सावंतवाडी शहरात काजीशहाबुद्दीन हॉल येथे आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराची सावंतवाडी उबाठा शिवसेना पदाधिकारी व डॉक्टर यांच्याकडून उद्घाटन करण्यात आले. नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभाला. जवळपास १५० हून अधिक जणानी या शिबिरामध्ये सहभागी होत ईसीजी सहित जर्मन स्कॅनिंग अशा विविध पद्धतीच्या तपासण्या करुन घेतल्या. अशा प्रकारचे शिबिर विविध ठिकाणी राबविण्यात यावे अशी मागणी यावेळी पदाधिकारी यांच्याकडे नागरिकांनी केल्या. त्यावर माजी आमदार जीजी उपरकर यांनी लवकरच पुन्हा असे शिबीर आयोजीत करण्याचे आश्वासन दिले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या शिबिरात नागरिकांचा वाढता सहभाग होता त्यामुळे उशिरा पर्यंत तपासणी सुरू होती.  माजी आमदार उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आशिष सुभेदार यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात माऊली कर्णबधीर मूकबधिर विद्यालयात मुलांना स्नेहभोजन,  सावंतवाडी शहरात आरोग्य शिबिर, १४ रोजी  नेत्र तपासणी चष्मे वाटप,प्राथमिक आरोग्य केंद्रात ब्लँकेट, चादर  वाटप व क्रिकेट स्पर्धा असे विविध कार्यक्रम श्री सुभेदार यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.