आंबोलीत मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर

Edited by: विनायक गांवस
Published on: September 19, 2024 09:46 AM
views 130  views

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोंबर या कालावधीत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमीत्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष वैद्यकीय मदत कक्ष , महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ - नाशिक, निरामय फाऊंडेशन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने आंबोली ग्रामपंचायतमध्ये बुधवारी मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात आंबोलीतील अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला. यात महिला वर्गाचा मोठा सहभाग घेतला.

 या  शिबिराचे उदघाटन आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांच्या हस्ते व माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे, भाजपा आंबोली गाव अध्यक्ष रामचंद्र गावडे, गेळे उपसरपंच विजय गवस, ग्रामपंचायत सदस्य छाया नार्वेकर, वामन पालेकर, मनोहर बंड, विजय परब, भाजपा आंबोली गाव अध्यक्ष रामचंद्र गावडे, आंबोली माजी उपसरपंच  नमिता राऊत, आंबोली हायस्कूल संचालक विजय परब, आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र निरीक्षक श्री. गावडे यांच्यासह भाजपा पधादिकारी, आशा सेविका व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 

या शिबिरात रक्तदाब, शुगर, इसीजी,आवश्यक वाटल्यास लॅब ला पाठविण्या करिता रक्त व लघवीचे नमुने जमा करणे व इतर आजार व रोग निदान करणे तसेच पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करणे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची माहिती देणे, आभा कार्ड काढण्यासाठी  सहकार्य करणे इत्यादी बाबत मोफत सहकार्य व मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराच्या नियोजनासाठी भाजपा वैद्यकीय आघाडीने शिबीर समन्वयकाची भुमिका बजावली आहे. यासाठी डॉ. रामचंद्र चव्हाण जिल्हा संयोजक भाजपा वैद्यकीय आघाडी यांनी काम पाहिले. या आघाडीतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात " विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबीर ” ३० ऑक्टोबरपर्यंत सर्व तालुक्यामध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.