ओटवणेत २५ जूनला आरोग्य शिबीर...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 23, 2023 11:43 AM
views 155  views

सावंतवाडी : गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, ओटवणे मांडवफातरवाडी येथील संकल्प सेवा संघ तसेच सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट आणि सावंतवाडी तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २५ जून रोजी मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ओटवणे मांडवफातरवाडी शाळा नं २ येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांनचे तज्ञ डॉक्टर  हृदयरोग उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, थायरॉईड, बालरोग, स्त्रीरोग व अन्य जुनाट विकार असलेल्या रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे देण्यात येणार आहे.

शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, संकल्प सेवा संघ तसेच सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट आणि सावंतवाडी तालुका केमिस्ट असोसिएशनने केले आहे.