
सावंतवाडी : कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी मर्यादित व ग्रामपंचायत कलंबिस्त कलंबिस्त हायस्कूल व विजय क्रीडा मंडळ भांडूप यांच्या संयुक्त विद्यमाने कै. यश विर्नोडकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मोफत महा आरोग्य शिबिर मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी कलंबिस्त हायस्कूल येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
कलंबिस्त पंचक्रोशीत कलंबिस्त शिरशिंगे, वेर्ले, सांगली, सावरवाड या भागात सैनिकी परंपरा आहे. अशा या सैनिकी परंपरा लाभलेल्या गावात तज्ञ डॉक्टरांच्या टीम तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि औषध उपचार या शिबिरामध्ये केला जाणार आहे. या शिबिरामध्ये सर्व तपासण्या केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे हे शिबिर संपूर्ण दिवसभर असून रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन आहार तज्ञांकडून आहाराविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. हिमोग्लोबिन तपासणी केली जाणार आहे. दोन सत्रात हे शिबिर होणार असून सकाळच्या सत्रात तपासणी दुपारी दोन वाजल्यानंतर पंचकर्म व योगासंदर्भात प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाणार आहे. कलंबिस्त हायस्कूलमध्ये तपासणीसाठी वेगवेगळ्या डॉक्टरांची टीम कक्ष केला जाणार आहे. रुग्णांना तपासणीसाठी येताना गर्दी होऊ नये यासाठी संपूर्ण दिवसभर हे शिबिर ठेवण्यात आले आहे.
मोफत चिकित्सा व संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सर्दी खोकला ताप दमा संधिवात स्त्रियांचे आजार अस्थिरोग तज्ञ या शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत. या शिबिरामध्ये डॉक्टरांची टीम येणार आहे. त्यामध्ये डॉ.जे एस यादव फिजिशियन आणि सर्जन, दत्तकुमार कोराडे डिप्लोमा इन ऑप्थल्मिक टेक्नॉलॉजी, डॉ.प्रथमेश शि.पई (एम्.डी.पंचकर्म), डॉ.प्रथा प्र.पई (एम्.डी. डॉ.कांचन द.विर्नोडकर (बी.ए.एम्.एस्) आदी असणार आहे. शिवसेना नेते संजू परब, हायस्कूल अध्यक्ष शिवाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कलंबीस्त पंचक्रोशीत शेतकरी वर्ग तसेच सर्व नागरिक आजी-माजी सैनिक महिला आदी सर्वांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजू विर्नोडकर, कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक संस्थेचे चेअरमन अँड. संतोष सावंत, सामाजिक कार्यकर्ते संतोष तळवणेकर, सरपंच सपना सावंत, मुख्याध्यापक अभिजीत जाधव आदींनी केले आहे. अल्प दरात चष्मा वाटत देखील यावेळी करण्यात येणार आहे.