कणकवली पत्रकार समितीतर्फे 31 ऑक्टोबरला आरोग्य शिबिर

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 26, 2023 11:39 AM
views 105  views

कणकवली : कणकवली तालुका पत्रकार समिती, रोटरी क्लब कणकवली आणि संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली तालुका पत्रकार समितीच्या सदस्यांकरीता मंगळवार 31 ऑक्टोबर रोजी संजीवनी हॉस्पिटल येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

पत्रकारांचे आरोग्य सुदृढ रहावे या उद्देशाने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सीबीसी, ब्लडशुगर, क्रिएटीन टेस्ट, कोलेस्ट्रॉल, इसीजी, बीपी आदी तपासण्या करण्यात येणार आहेत. रक्त तपासणीसाठी पत्रकारांनी सकाळी 8 वा. येणे आवश्यक आहे. यासाठी आदल्या दिवशी रात्री 10 वा.पर्यंत जेवण घेतल्यानंतर काही खाऊ नये. रक्त तपासणी नंतर नाष्ट्याची सोय संजीवनी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी 1 वा.पर्यंत जेवण घेतल्यानंतर सायंकाळी 3.30 ते 4 वा. या दरम्यान पुन्हा ब्लड टेस्ट व जनरल चेकअप होणार आहे. या शिबिरादरम्यान सकाळी 10 वा. रोटरी क्लबचे अध्यक्ष रवी परब व डॉ. विद्याधर तायशेटे यांचा छोटेखानी सत्कार करण्यात येणार आहे. तरी या आरोग्य शिबिरात तपासणी करू इच्छिणार्‍या पत्रकारांनी आपली नावे रविवार 29 ऑक्टोबरपर्यंत माणिक सावंत (9421238953) व तुषार हजारे (9763744974) यांच्याकडे नोंदणी करावी.

तरी पत्रकार समितीच्या सर्व सदस्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवली तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अजित सावंत, सचिव माणिक सावंत, खजिनदार योगेश गोडवे व कार्यकारिणीच्यावतीने करण्यात आले आहे.