
देवगड : ग्रामपंचायत सभागृह दाभोळे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत दाभोळे यांच्या वतीने ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबीर दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या शिबीरात नागरिकांची एक्स-रे तपासणी, आभा कार्ड व आयुष्मान भारत (PMJAY) – PMVVY नोंदणी तसेच महिलांची HB तपासणी करण्यात आली. या शिबीरात १२१ नागरीकांनी या शिबीराचा लाभ घेतला या शिबीरात डॉ. प्रितेश साळवी यांनी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. या आरोग्य शिबीरात ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, गावातील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनी सहकार्य केले. या शिबीराचे सुत्रसंचलन व आभार ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग शेडगे यांनी मानले .










