
सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सवासाठी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात साथरोगाचा फैलाव होवू नये यासाठी १० सप्टेंबर पासून जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन, बस स्थानके व चेक पोस्ट येथे कार्यरत करण्यात आलेल्या वैद्यकीय पथकांनी तब्बल विविध साथीचे २०३१ रुग्ण शोधून त्यांना उपचार दिले.तर तर १२४ रुग्णांचे रक्त नमुने घेऊन तपासणी साठी पाठविले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने कामानिमित्त जिल्ह्याबाहेर राहतात. हे नागरिक गणेश चतुर्थी निमित्त जिल्ह्यात एस टी किंवा रेल्वेने जिल्ह्यात दाखल होत असतात. मात्र, हे नागरिक ज्या शहरात कामानिमित्त राहत असतात. त्या ठिकाणी सुरु असलेला साथरोग त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात येवू शकतो. त्यामुळे खबरदारी १० सप्टेंबर पासून १८ पथके जिल्ह्यातील विविध रेल्वे स्थानके, एस टी बस स्थानक , तसेच चेक पोस्ट येथे नियुक्त करण्यात आली होती.
कणकवली, सावंतवाडीरोड, वैभववाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग या रेल्वे स्थानकावर, तसेच मालवण, वेंगुर्ला, कणकवली, देवगड, सावंतवाडी, कुडाळ बस स्थानक आणि आंबोली, फोंडाघाट, खारेपाटण, दोडामार्ग करूळ चेकपोस्ट अशा एकूण १८ ठिकाणी ही पथके कार्यरत ठेवण्यात आली होती .
या पथकामार्फत १० सप्टेंबर पासून सर्दी खोकला असलेले ४७० रुग्ण, फक्त ताप असलेले १२५ रुग्ण, विशेष तापाचा १ रुग्ण , काविळ १ रुग्ण ,अतिसार हगवण २९ रुग्ण, तर इतर किरकोळ आजाराचे १४०५ रुग्ण अश्या एकूण २०३१ रुग्णांचा शोध घेण्यात आला. या सर्व रुग्णांची माहिती गोळा करताना ते कोणत्या गावी जाणार, किती दिवस राहणार, याबाबतची माहिती घेण्यात आली आहे त्यानुसार संबंधित आरोग्य केंद्रांना खबरदारी घेण्याच्या तसेच संबंधित रुग्णांवर औषध उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच तापाच्या १२४ रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत . सापडलेल्या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत तसेच सदर्भ सेवेसाठी ५ रुग्नाना ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे.अशी माहिती यावेळी डॉ धुरी यांनी दिली .
तालुका निहाय उपचार केलेले २०३१ रुग्ण
कणकवली ५०८,कुडाळ ६३३, सावंतवाडी ५२०, देवगड १८२, मालवण ४२, वेंगुर्ला ४८, दोडामार्ग ७६, वैभववाडी २२,












