LIVE UPDATES

दुचाकींची समोरासमोर धडक ; 1 जागीच ठार

एक गंभीर जखमी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 25, 2025 20:05 PM
views 1486  views

कणकवली  : कणकवली - कनेडी मार्गावरील सांगवे येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसली. बुधवारी सायंकाळी ६.३० वा. सुमारास झालेल्या या अपघातात एका दुचाकी वरील अनंत सातेरी घाडी (34, बेळगाव) हा जागी ठार झाला. तर चिन्मय सुनील शिरसाट (24, नाटळ) हा गंभीर जखमी झाला अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावून घेतली. 102 रुग्णवाहिकेने दोन्ही दुचाकीस्वारांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता अनंत घाडी मृत्युमुखी पडला होता. तर चिन्मय शिरसाट याला अधिक उपचारासाठी कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.