
कुडाळ : आपल्याला जेव्हा वडील रागावतात तेव्हा आपल्या वडिलांवर रागावणारे आपले आजोबा असतात. त्यावेळी आपल्याला जाणीव होती आपल्यावर रागवणाऱ्या बापावर रागावणारे कोणी तर त्याचा बाप आहे. आणी तो रागावणार बाप म्हणजे ते आपले आजोबा होय. याची जाणीव होते. तेव्हा खरा आपल्याला जीवनात आनंद होत असतो. ज्यांना ज्यांना आई वडील बरोबर जीवनात लहानपणी आजी आजोबांची साथ लाभली तो सगळ्यात या जगातला भाग्यवंत आहे. असे सांगत आजच्या आजी आजोबा दिनाचे आपण स्वागत करत असल्याचे प्रतिपादन माणगाव हायस्कूलचे प्राचार्य प्रशांत धोंड यांनी केले.
माणगाव हायस्कूलच्या वतीने आयोजित आजी आजोबा दिन येथील शाळेच्या सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरून प्रशांत धोंड बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रशांत धोंड, प्रमुख पाहुणे सिईओ वि.न.आकेरकर, उपमुख्याध्यापक संजय पिळणकर,पर्यवेक्षक सी.डी. चव्हाण व आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते.