'तो' केसरकरांच्या मनाचा मोठेपणा : नारायण राणे | पाठीशी खंबीरपणे उभा रहाणार !

Edited by: विनायक गावस
Published on: April 04, 2024 14:13 PM
views 686  views

सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर माझ्याबद्दल चांगलं बोलतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. ते चांगलं बोलतात म्हणजे माझे ग्रह बदलले असं म्हणाव लागेल अशी मिश्किल टीपण्णी राणेंनी केली. केसरकरांबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते. ते म्हणाले, राजकारणात कधीही कुणी कायमचा दुश्मन नसतो. वैचारिक मतभेद असू शकतात. मी कधीही वैयक्तिक दुश्मनी ठेवली नाही. जो आपल्याला मदत करतो त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा रहाणार असं मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांच्याविषमयी बोलताना व्यक्त केल.