विधानसभेत भाषण करू शकत नाही तो दहा वर्षे आमदार : नारायण राणे

Edited by: भरत केसरकर
Published on: April 27, 2024 09:47 AM
views 507  views

कुडाळ : ही लोकसभेची निवडणूक देशाच्या १४० कोटी जनतेसाठी आवश्यक अशी आहे. दहा वर्षात मोदींनी आपल्या देशाचे नाव जगाच्या पाठीवर नेल. कर्तबगार माणूस आणी महागुरू म्हणून मोदींची ओळख झाली. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी आपण मैदानात उतरलो आहोत. गेल्या  ३४ वर्षात अनेक पदे मला कोकणी जनतेमुळे मिळाली. मागचा एक निकाल माझ्या मनाला लागला. जो साधा विधानसभेत भाषण करू शकत नाही तो दहा वर्षे या भागाचा आमदार आहे. मी केलेल्या कामामुळेच पक्षाने मला उमेदवारी दिली आहे.

जिल्ह्यात अनेक विकासाच्या गंगा आणल्या. यांना दुसरांच्या मुलांचे बारसे करायची सवय आहे. अनेक उद्योग या माणगाव खोऱ्यात आणले. उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आज प्रवेश करतायेत त्यांच स्वागत करतोय. दोन रूपये भरून शिवसेनेचा सभासद झालो. उद्धव ठाकरेची पत्नी म्हणायची की जोपर्यंत नारायण राणे सेनेत आहे तोपर्यंत उद्धव ठाकरेंना पद मिळणार नाही. उद्धव ठाकरेंची क्षमता नाही. आता खासदार पाच आहेत. पण निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेचे खासदार झिरो होतील. ह्या जिल्ह्यातील मुले डाॅक्टर, इंजिनिअर, वकील, उद्योगपती, पोलीस व्हावीत ही माझी इच्छा आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा त्याग केला आणी सत्ता गेली. जे डी. एड. झालेत त्याना नोकरी ही मिळालीच पाहिजे. उबाठा सेनेवाले निनावी पत्रके वाटत आहेत. हिम्मत असेल तर नाव टाकून पत्रके वाटा. असा टोला  राणेंनी लगावला आहे.