
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग, अधिव्याख्याता हवाबी समद शेख यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, रायगडशी संलग्न अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,कोल्हापूर येथून एमटेक इन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट विशेष प्रविण्यासहित पूर्ण करून विद्यापीठात प्रथम क्रमांक प्राप्त केला. याबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समद शेख, वहिदा समद शेख व शेख कुटुंबीयांकडून या यशाबद्दल कौतुक केले आहे.