
दोडामार्ग : तालुक्यात बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजची वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी हर्षदा राजन शेटकर हिने ८५.१७ टक्के गुण मिळवीत तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. तर सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कुडासे या काॅलेजची विद्यार्थिनी अनुष्का गोविंद राऊत ८४.६७ टक्के (विज्ञान शाखा) द्वितीय क्रमांक तर याच काॅलेजचा विद्यार्थी पुंडलिक परशुराम कोतेकर (विज्ञान शाखा) व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशीचा विद्यार्थी धनंजय जावू खरवत (वाणिज्य शाखा) ८२.५० टक्के मिळवत विभागुन तृतीय क्रमांक पटकावला.
तालुक्यातील एकूण ३२५ विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. दोडामार्ग इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज कॉलेज दोडामार्गचे एकूण १७८ विद्यार्थी, सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कुडासेचे १०३ विद्यार्थी व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशीचे ४४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण झाले. काॅलेज निहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विद्यार्थी
१) दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज दोडामार्ग कला शाखा - १०० टक्के - प्रथम श्रद्धा कृष्णा रेडकर ६९.१७ टक्के, द्वितीय आवडे महादेव शिरोडकर ६७ टक्के व तृतीय दिक्षा सतीश कुबल ६४.६७ टक्के.
वाणिज्य शाखा १०० टक्के - प्रथम हर्षदा राजन शेटकर ८५.१७ टक्के, द्वितीय सेजल गोपाळ गवस ८०.५० टक्के व तृतीय विभागुन साक्षी राघोबा राऊळ व सानिया अशोक गौंडळकर ७८.६७ टक्के
विज्ञान शाखा १०० टक्के - प्रथम पियुष अंकुश मोरजकर ८१.६७ टक्के, द्वितीय अर्पिता राजेश कारेकर ७२.१७ टक्के व तृतीय चैतन्या हृदयनाथ हंडे ७१.५० टक्के.
२) न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी, कला शाखा १०० टक्के - प्रथम कौसर बशीर नदाफ ६९.५० टक्के, द्वितीय विघ्नेश विठ्ठल गवस ६८.५० टक्के व तृतीय तन्वी सूर्यकांत नाईक ६४.६७ टक्के
वाणिज्य शाखा १०० टक्के - प्रथम धनंजय जावू खरवत ८२.५० टक्के, द्वितीय मंगला श्रीपाद गवस ८२.३३ टक्के, तृतीय विभागुन दीपा चंद्रभान हरिजन व प्रथमेश संतोष गवस ७१.८३ टक्के.
३) सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि. काॅलेज ऑफ सायन्स, कुडासे १०० टक्के - प्रथम अनुष्का गोविंद राऊत ८४.६७ टक्के, द्वितीय पुंडलिक परशुराम कोतेकर ८२.५० टक्के व तृतीय अदिती लक्ष्मण देसाई ७३.८३ टक्के