
देवगड : तांबळडेग येथील जागृत देवस्थान श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह १७ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. रोज सायंकाळी ७.३० वा. सांज आरती, पहाटे ५.३०.वा काकड आरती,रोज रात्रौ ११ वा. चित्ररथ देखावे दिंड्यांचे सादरीकरण होणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी अखंड हरिनाम सांगता आणि दहीकाला प्रसाद वाटप, रात्रौ१० वा. प्रहर क्र ३ यांच्या सौजन्याने 'चांडाळ चौकडी' मालवणी दोन अंकी नाटक होणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद (समाराधना), या अखंड हरिनाम सप्ताह वार्षिक उत्सवाला सर्व भाविक भक्तांनी भजन मंडळी सह उपस्थित राहावे असे आवाहन श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिर तांबळडेग मधलीवाडी (रजि.) मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे,