बांधकाम कामगार महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी हरी चव्हाण यांची फेरनिवड

Edited by:
Published on: May 19, 2025 17:59 PM
views 105  views

मालवण : भारतीय मजदूर संघ या अखिल भारतीय कामगार संघटनेस संलग्न असलेल्या बांधकाम कामगार महासंघाच्या प्रदेश अध्यक्ष पदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र कामगार नेते हरी चव्हाण यांची फेर निवड झाली आहे. संघटनात्मक कामाचा झपाटा आणि कामगारांना न्याय मिळवून देण्याची धडाडी लक्षात घेऊन पुन्हा एकदा त्यांच्यावर अध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात आल्यामुळे कामगार वर्गातून अभिनंदन केले जात आहे.

बांधकाम कामगार महासंघाचे ४ थे त्रैवार्षिक प्रदेश अधिवेशन दिनांक १८ मे २०२५ रोजी कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान सभागृहात संपन्न झाले. या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नितेश राणे, सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष ऍड अनिल ढुमणे, प्रदेश महामंत्री किरण मिलगीर, केंद्रीय पदाधिकारी सुरेश शेलार, भा.ज.पा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, महासंघाचे सरचिटणीस संजय सुरोशे, महासंघाचे जिल्हाध्यक्ष भगवान साटम, मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष सत्यविजय जाधव आदी उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी  नितेश राणे यांनी मी तुमचा हक्काचा माणूस आहे. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे. ही माझ्या परीवारातील संघटना आहे. ती मजबूत करण्यासाठी व प्रत्येक कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्या पाठीशी ठाम उभा राहील अशी ग्वाही दिली.

या अधिवेशनात बांधकाम कामगार महासंघाचे प्रदेश सरचिटणीस संजय सुरोशे यांनी आपल्या मागील तीन वर्षाच्या काळातील कार्य अहवाल सादर केला. महासंघाचे प्रदेश कोषाध्यक्ष बाळकृष्ण कांबळे यांनी आर्थिक अहवाल सादर केला. या अधिवेशनात नोंदीत बांधकाम कामगारांना  90 दिवस कामाचे प्रमाणपत्र मिळावे. पेन्शन योजनेत कामगारांचा सहभाग वाढवावा, बांधकाम मंडळाचे पुनर्गठन करण्यात यावे व जिल्हास्तरावर तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात यावी. आधी ठराव करण्यात आले. या अधिवेशनात आगामी तीन वर्षाच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली. यामध्ये बांधकाम कामगार महासंघाच्या प्रदेश अध्यक्ष पदी हरी चव्हाण यांची फेर निवड करण्यात आली तर प्रदेश सरचिटणीस म्हणून रवींद्र माने - सातारा यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विकास सुतार - रायगड, सुरेश कोंडके - छ. संभाजीनगर, बाळासाहेब पांचाळ - हिंगोली, वंदना तावडे - सिंधुदुर्ग, सुनील कोळी - जळगाव, रेश्मा शीलवंत - सातारा, चिटणीस म्हणून हेमंतकुमार परब - सिंधुदुर्ग, प्रशांत कांबळे - कोल्हापूर, राहुल बोडके - पुणे, लहूराज शिंगाडे - सातारा, संतोष लाड - रत्नागिरी, किरण काकडे - धुळे, कोषाध्यक्ष म्हणून बाळकृष्ण कांबळे - ठाणे, संघटनमंत्री म्हणून संजय सुरोशे - नांदेड, कार्यकारणी सदस्य म्हणून जयवंत शेटे - सातारा, भास्कर गव्हाणे - ठाणे, पवन खूपसे - नांदेड, यांची एक मताने निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असंघटित क्षेत्र सहप्रभारी श्रीपाद कुटासकर यांनी केले. या अधिवेशनास महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यंमधून १ हजार पेक्षा जास्त बांधकाम कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. हे त्रैवार्षिक अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सचिव प्रवीण जाधव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी श्री अशोक घाडीगावकर, राजेंद्र आरेकर, ओमकार गुरव, दत्ताराम घाडीगांवकर, विकास गुरव, सुधीर ठाकूर, संतोष परब, सुनिता ताटे, वृषाली बागवे, प्राची परब, वंदना तावडे, अखिल गुरव, अशोक राऊळ, सुधीर भरडे, ज्ञानदेव भोगले, सुधीर वायंगणकर, दिनेश घाडी, सूर्यकांत कुडतरकर, दिनेश तेली , बबन डोईफोडे, स्वप्निल घाडी, आधी व अन्य कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.