
वैभववाडी : भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वैभववाडी शहरात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे.यानिमित्ताने वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि.१३ ऑगस्ट रोजी सकाळी ११वा. शहरात तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.दत्तविद्यामंदीर ते नगरपंचायत कार्यालयापर्यंत ही यात्रा निघणार आहे.दि.१४ऑगस्टला सकाळी ९वा कासारव्हाळ ते संभाजी चौक बाईक रॅली,त्यानंतर नगरपंचायत पटांगणात सकाळी १०.तिरंगा मेला तसेच सायंकाळी ४ वा.नगरपंचायत कार्यालयात वीरांना मानवंदना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांतर्गत शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून त्याचा सेल्फी नगरपंचायतीकडे पाठवावा.तसेच स्वातंत्र्य दिनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगरपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.