सावर्डेत ‘हर घर तिरंगा’ ; प्रभात फेरी - सायकल रॅली

Edited by: मनोज पवार
Published on: August 12, 2025 11:53 AM
views 140  views

सावर्डे : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे प्रभात फेरी व सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आयोजित टप्पा-दोनमधील या उपक्रमात विद्यालयातील सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन मोहल्ला व आजूबाजूच्या परिसरातून प्रभात फेरी काढली. या वेळी “हर घर तिरंगा”, “भारत माता की जय” अशा देशभक्तिपूर्ण घोषणा देत वातावरण भारावून टाकले. त्याचबरोबर सायकल रॅलीद्वारेही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधले.

या उपक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे व उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी केले. आयोजनात शिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे, प्रशांत सकपाळ व सुधीर कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.