जामसंडे मळई इथं हनुमान जयंती उत्साहात !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 24, 2024 10:10 AM
views 33  views

देवगड : देवगड मळई येथील बाल मंडळ संगीत मेळा यांच्यावतीने मळईवाडी हनुमान मंदिर येथे २२ व २३ एप्रिल रोजी श्री हनुमान मंदिर वर्धापन दिन व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला.यावेळी नदू शेठ घाटे मंडळाचे उपाध्यक्ष सत्यवान मणचेकर, जयप्रकाश कोयंडे,बाळकृष्ण राजम, कमलाकर कोयंडे,दीलीप कोयंडे, उमेश भाबल,नंदकुमार वाडेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मळई मर्यादित विविध स्पर्धा (रांगोळी, चित्रकला, कॅरम, बुद्धिबळ, हस्ताक्षर व प – श्नोत्तर स्पर्धा), सायंकाळी ७ वा. दीपोत्सव, रात्री ८ वा. श्री देव मांडकरी प सादिक भजन मंडळ, मळई यांचे भजन, रात्री १० वा. श्री पावणाईदेवी प्रासादिक भजन मंडळ, किंजवडे परबवाडी यांचे दिंडी भजन संपन्न झाले

तसेच २३ रोजी सकाळी ६.१८ वा. श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, आरती, दर्शन व तीर्थप्रसाद, ८ वा. पालखी प – दक्षिणा, ११ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. महिलांसाठी होम-मिनीस्टर स्पर्धा , ७ वा. महाआरती, रात्री ८ वा. स्थानिक भजने, रात्री ९.३० वा. स्पर्धांचे बक्षीस वितरण, १० वा. स्थानिक कलाकारांची धमाल विनोदी एकांकिका लग्न कल्लोळ, ११ वा. ब – म्हणदेव महिला मंडळ, नाद भोळेवाडी यांचे समई नृत्य सादर करण्यात आले. तसेच या वेळी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.अशा प्रकारे विविध कार्यक्रमांनी मळई येथील हनुमान जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.