वैश्यवाडा सावंतवाडीत हनुमान जन्मोत्सव सोहळा

Edited by: विनायक गांवस
Published on: April 10, 2025 19:14 PM
views 29  views

सावंतवाडी : वैश्यवाडा सावंतवाडी येथील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. हा सोहळा शनिवार, १२ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला आयोजित केला जाणार आहे.

या निमित्त शनिवार, १२ एप्रिल रोजी सकाळी ८:०० वाजता श्री हनुमान जन्मोत्सवाचे कीर्तन ह.भ.प. सौ. ललिन प्रभाकर तेली यांच्याद्वारे सादर होईल. दुपारी ३:०० वाजताः श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद वाटप करण्यात येईल. सायंकाळी ६:३० वाजताः भजनांचा कार्यक्रम आयोजित केला जाईल. तर रात्री ८ वाजता श्री ब्राम्हणदेव महिला समई नृत्य नाद, भोळेवाडी देवगड यांच्या समई नृत्याचा आनंद भाविकांना घेता येईल. त्यानंतर रात्री १० वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तर दुसऱ्या दिवशी रविवार, १३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता देवी माऊली दशावतार नाट्यमंडळ, इन्सुली यांचे अध्यात्मिक ट्रिकसिनयुक्त दशावतार नाट्यप्रयोग "संत सखूसाठी देव सखू झाला" सादर होईल. या नाटकात संत परंपरेवर आधारित भक्तीप्रधान अध्यात्मिक ट्रिकसिनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाईल.