बदलापूर प्रकरणातील आरोपीला फाशी द्या !

उबाठा शिवसेनेची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: August 22, 2024 09:24 AM
views 213  views

सावंतवाडी : बदलापूर येथील शाळेत अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध संबंधित युवकाला फाशी देण्यात यावी अशी मागणी उबाठा शिवसेनेन केली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्या लहान मुलीवर अक्षय शिंदे नावाच्या नराधमाने विकृतपणे लैंगिक अत्याचार केले. या नराधमाला भारतीय न्याय संहिते अंतर्गत फाशीची शिक्षा देण्यात यावी, या सर्व घटनेला संबंधित नराधमाबरोबर सर्व स्टाफ सुद्धा जबाबदार आहे.  त्यांनी जर व्यवस्थित लक्ष दिले असते तर संबंधित घटना घडली नसती. या विरोधात संबंधित आरोपी तसेच सर्व व्यवस्थापन कर्मचारी स्टाफ हा सर्वस्वी जबाबदार आहे. या घटनेची इतर ठिकाणी पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने सावंतवाडी तालुक्यातील सर्व खासगी शाळा अंतर्गत लहान मुलींसाठी त्यांच्या देखरेखीसाठी महिला स्टाफ प्रकाशाने नेमण्यात यावा अशी मागणी उबाठा शिवसेनेन केली.


याची कार्यवाही येत्या सात दिवसात करण्यात यावी. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सर्व सावंतवाडी तालुका पदाधिकारी संबंधित घटनेचा जाहीर निषेध करत आहोत असं सांगितलं. पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस ठाणे, सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन दिले. यावेळी सावंतवाडी उपतालुकाप्रमुख आबा सावंत सावंतवाडी संघटक मायकल डिसोजा शब्बीर मणियार तालुका संघटिका भारती कासार शहर अध्यक्षा श्रुतिका दळवी श्रावणी धुरी विनोद ठाकूर सुनील गावडे, सुशील चौगुले, समीरा शेख, परकारा, विजया रजपुत, दिव्या पवार, प्रगती बामणे आदी उपस्थित होते.