
सावंतवाडी : गुन्हेगाराला कोणती जात, धर्म, पंत नसतो. त्यामुळे संतोष देशमुख हत्तेमागे जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा होईल असा सबळ पुरावा गोळा करून मयत सरपंच देशमुख यांना न्याय द्यावा. अन्यथा सकल मराठा समाज उग्र आंदोलन छेडेल असा इशारा सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांनी दिला. प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याकडे सकल मराठा समाजाकडून तसं निवेदन देण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण पणे हत्या करण्यात आली. मात्र, अद्याप मुख्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. या विरोधात आज सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मराठा समाजाच्या भावना शासन दरबारी पोहचवाव्यात अशी मागणी केली. यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे, माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना युवा नेते दिनेश गावडे,प्रा सतीश बागवे यांनी तीव्र भावना व्यक्त करत आरोपिंना त्वरीत अटक करण्यात यावी व फाशीची शिक्षा होईल असा सबळ पुरावा गोळा करावा अशी मागणी केली.
याप्रसंगी अशोक दळवी, सुभाष गावडे, पंढरीनाथ राऊळ, अभिमन्यू लोंढे ,विश्वास घाग, समीर परब, विलास कुडतरकर, जयसिंग सावंत, सतीश बागवे, भिकाजी धोंड, प्रशांत मोरे, सुंदर गावडे, दयानंद परब, केतन कुमार गावडे, मंगेश सावंत, मनोज घाटकर, चंद्रकांत बिले, लक्ष्मण मोरजकर, प्रमोद सावंत, ॲड चंद्रशेखर गावडे, राजू तावडे, विनायक सावंत, संजय लाड, नारायण राणे, आकाश मिसाळ, महादेव राऊळ, संदीप गावडे, तारकेश सावंत, देवेंद्र सावंत, नितीन गावडे, नारायण गावडे, आबा सावंत, जगदेव गवस, दीपक गावकर, प्रवीण गुरव, गुलाबराव गावडे, धर्मेंद्र सावंत, रामचंद्र सावंत, संदीप राणे, दिगंबर नाईक, दिनेश गावडे आदि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.