चला, या सुट्टीत काहीतरी करू वेगळं ; सावंतवाडीत हस्ताक्षर सुधार वर्ग

Edited by: जुईली पांगम
Published on: March 14, 2023 13:27 PM
views 134  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील माठेवाडा इथं सोमवारी 20 मार्च 2023 ते शनिवारी 25 मार्च 2023 या एका आठवड्याच्या कालावधीत दुपारी 3 ते 5 या वेळेत 7 वी ते 9 वीतील विद्यार्थ्यांसाठी दीर्घ मुदतीच्या सुट्टीचा सदुपयोग व्हावा, या उद्देशाने देवनागरी लिपी हस्ताक्षर सुधार वर्गाचे आयोजन करण्यात आलेय. 


ह्या वर्गामध्ये हस्ताक्षर मार्गदर्शनाबरोबर विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांचे कलागुण विकसित व्हावे, म्हणून व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. या वर्गाचे मार्गदर्शक हे शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केलेले तज्ञ मार्गदर्शक आहेत. 


इच्छुक विद्यार्थ्यांनी अथवा पालकांनी विकास गेवेकर 'अक्षर' - 57 माठेवाडा, सावंतवाडी (9421148737) या पत्त्यावर त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन हस्ताक्षर सुधार मंडळाने केले आहे.