
चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथे हमीद महमंद शेख या ३८ वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून दोन तरुणांनी त्याचा खून केला होता. शिवीगाळ आणि झालेली बाचाबाची यातून हा खून झाला असल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. त्यावेळी खून करणाऱ्या त्या दोघानीही मद्यप्राशन केले होते. दोघापैकी एकाला सोमवारी येथील न्यायालयात हजर केले असता १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, तर अल्पवयीन तरुणाची बाल सुधारगृहात रवागणी करण्यात आली आहे.
याप्रकरणी निलेश आनंद जाधव (२७, बडारकॉलनी, चिपळूण) अशी अटक केलेल्याचे नाव आहे. शहरातील शहरातील बहादूरशेख नाका परिसरातील वांगडे मोहल्ल्याकडे जाण्याऱ्या मुख्य रस्त्याच्या प्रवेशव्दारावर एका सलून दुकानाच्या पायरीच्या ठिकाणी हमीदच्या डोक्यात दगड आणि फरशी घालून रविवारी त्याचा खून करण्यात आला होता. भर चौकात झालेल्या या खूनाच्या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. असे असतानाच गोपिनिय माहिती व त्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज यातूनच पोलिस तपास यंत्रणेला सापडलेल्या धागेदोऱ्याच्या आधारे शहरातील वडारकॉलनी येथून निलेश जाधव व त्याच्यासह एका अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती.
त्यांच्या चौकशीअंती हमीदचा खून केल्याची त्यांनी कबुली दिली. निलेश जाधवसह त्याच्यासोबत असलेला एक अल्पवयीन तरुण आणि हमीद झाल. निलश जाधवसह त्याच्यासोबत असलेला एक अल्पवयीन तरुण आणि हमीद यांच्यात वाद झाला. शिवीगाळ आणि झालेली बाचाबाची यातूनच हा वाद विकोपाला गेला. निलेश जाधव व त्या अल्पवयीन तरुणाने हमीद याच्या डोक्यात दगड आणि फरशी मारली. हमीदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या काही तासात दोघाना ताब्यात घेऊन अटक केली. निलेश जाधव याला सोमवारी येथील न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर त्या अल्पवयीन तरुणाची बाल सुधारगृहात रवाणगी करण्यात आली आहे.