'आपला बझार' मध्ये उद्या हळदी कुंकू

Edited by: भरत केसरकर
Published on: January 20, 2024 14:38 PM
views 371  views

सावंतवाडी : आपला बझार सावंतवाडी यांच्यावतीने भगिनींसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन रविवारी २१ जानेवारीला करण्यात आले आहे. सावंतवाडी तसेच आपल्या परिसरातील भगिनींसाठी आपला बझार सावंतवाडी तर्फे मकर संक्रांती निमित्त हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला आहे. हळदीकुंक हे महिलांच्या सौभाग्याचे, प्रेमाचे आणी आपुलकीचे प्रतिक आहे. आणी हे प्रेम, आपुलकी, माया जपण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी ठेवून ह्या "हळदीकुंक" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सदर कार्यक्रमास आपल्या मैत्रिणीसह महिलांनी उपस्थित रहावे ही आग्रहाची विनंती आपला बाझार महिला कर्मचारी वर्गाच्यावतीने करण्यात आली आहे. रविवार २१ जानेवारी रोजी  सायंकाळी ३.०० ते ७.०० वाजेपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर हळदीकुंक कार्यक्रम आपला बझार, सावंतवाडी पाटील टॉवर, एस.टी. स्टॅण्डसमोर, शिवाजी चौक, आयसीआयसीआय बँक शेजारी, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी उपस्थित राहण्याचे आवाहन "आपला बझार, सावंतवाडी" च्या वतीने करण्यात आले आहे.