
दोडामार्ग : एन.सी.सी. दिनाचे औचीत्य साधून लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात “लष्कर व्यवस्थापन” या विषयावर से.नि.कॅप्टन प्रसाद गवस यांचा व्याख्यान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
एन.सी.सी. दिन २७ नोहेंबर रोजी देशभरात शाळा महाविद्यालयात साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचीत्य साधून लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय, दोडामार्ग येथे छात्र सैनिकांमध्ये देश भक्तीची प्रेरणा आणि नव चेतना निर्माण करण्यासाठी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी ‘भारतीय सैन्य व्यवस्थापन आणि कार्य’ या विषयावर कॅप्टन प्रसाद गवस यांचे व्याख्यान झाले. भारतीय सैनिक कार्य पद्धती आणि संपूर्ण व्यवस्थापन यंत्रणा या बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच छात्र सैनिकांना आपल्या कार्य नेतृत्वाची आवड आणि अभिमान असणे गरजेचे आहे। तरच तो या क्षेत्रात आपले योगदान सकारात्मक पद्धतीने देवू शकतो असे वक्तव्य व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष सावंत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपल्या शालेय जीवनातील एन.सी.सी. च्या आठवणीना उजाळा दिला. एन.सी.सी. करिअर च्या दृष्टीकोनातून किती महत्वाचे आहे तसेच एन. सी. सी. बी आणि सी प्रमाण पत्र याचे महत्व काय हे छात्र सैनिकांना सांगितले. आपल्या संघटन नेतृत्वातून देश - समज सेवे साठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
या.कार्यक्रमात छात्र सैनिकांचा बी परीक्षा प्रमाणपत्र आणि रेंक देऊन गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तद्नंतर कार्यक्रमांतर्गत छात्र सैनिकांनी सामुहिक पद्धतीने एन सी सी गीत हम सब भारतीय है याचे गान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्ट. प्रा. डॉ. पी. एन. ढेपे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.दिलीप बर्वे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. एस. एस. पाडगावकर यांनी मांडले.