रविवारी ज्ञानदीपचा पुरस्कार वितरण सोहळा !

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर राहणार उपस्थित
Edited by: विनायक गावस
Published on: November 01, 2023 20:02 PM
views 73  views

सावंतवाडी : येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे दरवर्षी दिले जाणारे २०२३ वर्षाचे पुरस्कार यापूर्वी जाहीर केले होते. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील ‍कळसुलकर हायस्कूल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर उपस्थित राहणार आहेत.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड . प्रा. अरुण पणदूरकर, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे -परब, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै आदि मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत.

हे आहेत पुरस्काराचे मानकरी -

सौ.सीमा पंडित (दोडामार्ग), प्रा.संतोष जोईल (फोंडाघाट),  पांडुरंग दळवी (वजराट ता . वेंगुर्ले) , निलेश मोरजकर (बांदा),  प्रकाश कानूरकर (कट्टा -मालवण), उत्तम फोंडेकर (कुंभारमाठ ता. मालवण) या उपक्रमशील व्यक्तिंना ज्ञानदीप शैक्षणिक मंडळातर्फे सन्मान चिन्ह शाल, श्रीफळ, गौरवपत्र,  देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

सामाजिक भान ठेवून विधायक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हे मंडळ कार्यरत आहे. 

गेली सतरा वर्षे सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे. तरी या विधायक कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष वाय.पी.नाईक, अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कार्याध्यक्ष निलेश पारकर, सहसचिव विनायक गांवस, खजिनदार एस.आर.मांगले व ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ परिवार यांनी केले आहे.