कुडाळात गुटखा विक्री करणाऱ्या 4 दुकानदारांवर कारवाई !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 30, 2023 16:27 PM
views 446  views

कुडाळ : अन्न व भेसळ विभागाने कुडाळ येथे कारवाई करत चार गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली आहे. ही कारवाई आज सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास करण्यात आलीय. 

कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अन्न व भेसळ विभागाने केलेली कारवाई ही ढोबळ असून कुडाळ शहरातील मुख्य पुरवठा दाराला कधी ताब्यात घेणार याची चर्चा कुडाळ बाजारपेठेत रंगत आहे.