सद्गुरू संगीत विद्यालयातर्फे ६ ला सावंतवाडीत "गुरुवंदना"

Edited by: विनायक गावस
Published on: August 03, 2023 11:28 AM
views 99  views

सावंतवाडी :  श्री सद्गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडीच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे 'गुरुवंदना' या कार्यक्रमाचे आयोजन रविवार ६ ऑगस्ट २०२३ रोजी विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे प्रथम व द्वितीय सत्रांमध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सद्गुरू संगीत विद्यालयाचे गुरूवर्य निलेश मेस्त्री यांचे नवोदित व यशस्वी विद्यार्थी शास्त्रीय गायन वादन करणार आहेत. या कार्यक्रमास सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोसले व युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत - भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून पं. जितेंद्र अभिषेकी बुवा यांचे शिष्य दामोदर उर्फ भाई शेवडे, (धारगळ -गोवा) व ज्येष्ठ कीर्तनकार श्रीराम दीक्षित (शिरोडा) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

                 

 प्रथम सत्र  स. ९.३० ते १.३० उद्घाटन समारंभ व नवोदित विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन वादनाचे सादरीकरण  तर दुसऱ्या सत्रात दु ४.०० ते ८.००  विद्यालयाच्या नामांकित व यशस्वी विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन वादनाचे सादरीकरण विठ्ठल रखुमाई मंदीर,सावंतवाडीत होणार आहे. यावेळी सर्व संगीत प्रेमींनी उपस्थित रहाण्याच आवाहन सद्गुरू संगीत विद्यालय शिष्य परिवार व पालक वर्गाकडून करण्यात आले आहे.