स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा..!

Edited by: विनायाक गावस
Published on: July 04, 2023 12:50 PM
views 113  views

सावंतवाडी : आपल्या जीवनाला योग्य मार्गदर्शन देणारे 'गुरु'च असतात. आणि आपल्या जीवनात गुरूंचे किती महत्त्व आहे हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या सह. शिक्षिका सौ. जरीन शेख व सौ. प्राची साळगावकर यांनी शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत व समन्वयक यांचे पुष्प देऊन स्वागत केले. तर उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. 

त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका व समन्वयक यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात इयत्ता १ ली च्या विद्यार्थिनीने गुरु वेद व्यासांचा वेश परिधान करून त्यांची भूमिका सादर केली व वेदव्यास यांच्याविषयी माहिती सादर केली. तर इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेवर आधारित गीत सादर केले. तसेच इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आकर्षक नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे इयत्ता १ ली, २ री व ३ री मधील काही विद्यार्थ्यांनी मिळून एक उत्कृष्ट नाट्य सादर केले. या नाट्याद्वारे विद्यार्थ्यांना गुरूंचे महत्त्व पटवून देण्यात आले. या कार्यक्रमात शिक्षकांसाठी देखील विविध खेळांची योजना केली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सह. शिक्षिका सौ. प्राची साळगावकर व सौ. अश्विनी जोशी यांनी केले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन व्यक्त केले. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्व शिक्षकांना गुरुौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे, विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात योग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचे महत्त्व पटवून देण्यासाठी गुरुपौर्णिमेचा हा उत्सव सर्व विद्यार्थ्यानी आनंदात साजरा केला.