
देवगड : देवगड तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ हडपिड येथे गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व सस्कृति कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त सकाळ पासूनच विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असणार आहे. हडपिड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे १० जुलै रोजी ‘गुरुपौर्णिमा उत्सव’ निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानी संपन्न होणार आहे.
सकाळी ७ ते १० गणेश पूजन, पादुका पूजन, पुण्यवाचन होमहवन,सकाळी १०.३० ते १२.०० नामस्मरण, दुपारी १२.०० ते १.०० महाआरती,दुपारी १.०० ते ३.०० महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ५.०० १० वी. व १२ वी. गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यरांच्या हस्ते सन्मान समारंभ.सायं. ५.०० ते ८.०० भक्तीमय कार्यक्रम होणार आहे.
तसेच देवगड तालुक्यातील प्राथमिक शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.या संपूर्ण कार्यक्रमास उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड कार्यकारी मंडळ (मुंबई) गाव समिती (हडपीड देवगड) यांच्या वतीने अध्यक्ष श्री. प्रभाकर धाकू राणे, सचिव अक्कलकोट भूषण स्वामीरत्न पुरस्कार सन्मानित श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर,खजिनदार ज्ञानेश्वर श्यामसुंदर राऊत या सर्वांनी आवाहन केले आहे.