
सावंतवाडी : सावंतवाडी - भटवाडी येथील श्री दत्त मंदिरात गुरुवार १३ फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळी लघुरुद्र, अभिषेक, श्री दत्त महापूजा, रात्री ७.३० वाजता सुप्रसिद्ध कलाकार अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर यांचा संगीताचा कार्यक्रम होणार आहे. रामचंद्र यादव, मधुसूदन कुलकर्णी व संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे शिष्य गायक सूरजन खंडाळकर व शुभम खंडाळकर, तबला रोहित श्रीवंत व पखवाज श्रीपाद भूमकर यांचा संगीताचा कार्यक्रम होणार आहे.