ग्रुप ग्रामपंचायत भडगाव बुद्रुक सरपंचपदाचा गुणाजी लोटेनी कार्यभार स्वीकारला

Edited by:
Published on: November 24, 2023 16:58 PM
views 112  views

कुडाळ : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भडगाव बुद्रुकच्या सरपंचपदाचा कार्यभार नवनियुक्त सरपंच गुणाजी लोट यांनी स्विकारला. गुणाजी लोट यांनी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा नेते  निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुरस्कृत पॅनलमधून निवडणूक लढवत प्रतिस्पर्धी उ. बा. ठा. गटाच्या उमेदवाराचा ११५ मतांनी पराभव केला होता.

या निवडणुकीत सरपंच गुणाजी लोट यांच्या सहित भाजपा पुरस्कृत पॅनेलचे ६ उमेदवार विजयी झाले होते. त्यात प्रभाग -१ मधून श्री राजेंद्र सत्यवान राणे प्रभाग- २ मधून प्रितेश सातू गुरव, आरती गजानन जडये, रोजमारी कैतान भुतेलो तर प्रभाग-३ मधून प्रथमेश उर्फ गणेश प्रदीप मोहिते व अंकिता अनिल सावंत हे उमेदवार विजयी झाले होते. भडगाव ग्रामपंचायत मध्ये मिळवलेल्या या विजयाबद्दल भाजपा नेते निलेश राणे यांनी नवनियुक्त सरपंच गुणाजी लोट तसेच उपसरपंच  अंकिता अनिल सावंत यांचे तसेच भडगाव गावातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले आहे.

या विजयासाठी भाजपा नेते श्री. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ओरोस मंडल अध्यक्ष श्री. दादा साईल, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, माजी जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर, कुडाळ तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, माजी पंचायत समिती सदस्य अरविंद परब, जि. प. विभाग प्रमुख दिलीप तवटे, जिल्हा कार्यकारणी सदस्य विनायक राणे, पप्या तवटे, रुपेश कानडे, दिपलक्ष्मी पडते, कसाल सरपंच राजन परब, नारायण गावडे, बाळू मडव, सुप्रिया वालावलकर,  नागेश परब, वृनाल कुंभार, प्रकाश पावसकर, अमित मडव, चेतन ढवळ, निखिल कांदळगावकर, विनोद सावंत, अमित तावडे, शुभम राणे, भडगाव बूथ अध्यक्ष अमित गुरव, तसेच भडगाव येथील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती.