
सावंतवाडी : शिवसेनेचा बालेकिल्ला वेत्ये गावात शिवसेना ठाकरे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार गुणाजी गावडे 133 मतांचं लीड घेत विजयी झाले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुणाजी गावडे यांना उचलून घेत एकच जल्लोष केला. गुणाजी गावडे यांनी विजयश्री खेचून आणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच वेत्ये गावातील वर्चस्व कायम राखल. १३३ मतांचं लीड घेत गुणाजी निवडून आले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख व नवनिर्वाचित सदस्य सुनील गावडे यांनी गुणाजी गावडे यांना निवडणूक आणख्यासाठी खांबल अन माझ्यात झालेली लढत ती एक खेळी होती असा गौप्यस्फोट केला. दरम्यान, गुणाजी गावडे यांच्या विजयानंतर कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. गुणाजी गावडेंच्या विजयान परिसरात भगव वादळ संचारल होत.