
सावंतवाडी: वेत्ये येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पॅनल पुरस्कृत वेत्ये ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार गुणाजी गावडे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. मतदारांचे आशीर्वाद, कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यामुळे माझा विजय हा निश्चित आहे. मंगळवार उडणारा गुलाल हा आमचाच असणार असा दावा गावडे यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत वेत्ये ग्रामविकास पॅनलचे प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.