सायबर सुरक्षा उपक्रमांतर्गत मार्गदर्शन...!

Edited by: विनायक गावस
Published on: October 16, 2023 17:10 PM
views 130  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग पोलीस दल पोलीस - जनता संवाद, सायबर सुरक्षा उपक्रमांतर्गत सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या नेमळे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात येथील इयत्ता  8 वी ते 12 वीच्या 160 विद्यार्थ्यांशी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते व महिला पोलिस कॉन्स्टेबल गौरी ताम्हणेकर यांनी आज संवाद साधला. 

यावेळी विद्यार्थ्यांना 'सायबर सुरक्षा अंतर्गत सोशल मीडिया पासवर्ड सेक्युरिटी डेटा प्रायव्हसी प्रायव्हसी डेटा शेअरिंग आयडेंटिटी हॅकिंग अकाऊंट क्लोनिंग' यासंदर्भात सुरक्षा व वाढते धोके यावर उपाययोजना, ऑनलाईन आर्थिक फसवणूक, गुगल पे,  पेटीएम, ऑनलाईन वॉलेट, अर्बन बँक, तनिष्क ज्वेलर्स, विविध शासकीय संस्था, बँका यांच्या नावाने होणारे फ्रॉड त्याचे प्रकार यावर सुरक्षा बाबत उपाय व स्वतःची जबाबदारी, ई-मेल व मेसेजिंग ॲप, ओटीपी फिशिंग लिंक क्लोनिंग ॲप यामधून फसवणूक याबाबत सुरक्षा, डार्क नेट-

ह्युमन ट्राफिकिंग, मनी लाँडरींग, दहशतवादी कारवाया - सतर्कता आपले कर्तव्य व सुरक्षा, व्यसनमुक्ती -

तंबाखू, गांजा, ड्रग्स, अंमली पदार्थ, तस्करी गुन्हेगारी, शरीरावर आणि मनोव्यापारावर परिणाम, देशविघातक कृत्ये, दहशतवाद फंडींग, वाढत्या हृदयविकार आणि स्ट्रोक समस्या, अॅडिक्शनपासून बचाव, धोके व उपाय, खबरदारी

यापासून वाढत्या वयात विचार नियंत्रण, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये देशविघातक चित्रफिती वायरल करणे, भ्रमित करणे, अफवा पसरून वाईट उद्दिष्ट साध्य करणे, तंत्रज्ञानातील स्थान आणि ते अजून घेण्याची दृष्टी व्यापक कशी असावी जेणेकरून देशाची एकत्मता अखंड राहील, गैरसमज होऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही, सायबर गुन्हे संपर्क व निवारण आणि त्यावर प्रथम उपचार यामध्ये डायल 112 प्रणाली, शासनाची अधिकृत तक्रार वेब साईट, पोलिसांचा कार्यभाग, मदत कार्यवाही, स्वतःचे कर्तव्य आणि ज्ञानाचा प्रसार याविषयी मार्गदर्शन केले.

तसेच महिला पोलिस कॉन्स्टेबल गौरी ताम्हनेकर यांनी महिला सुरक्षा पोक्सो व महिलांकरिता कायदेशीर सुरक्षा बाबी, आपले कर्तव्य, मुलींची छेडखानी परिणाम, हार्मोन चेंज दरम्यान वाईट विचारावर कंट्रोल, ध्येयाचे महत्व,व्यायाम, अभ्यास, व्यक्तिमत्त्व विकास स्वतःची जबाबदारी स्वच्छता, कर्तव्य, देशाभिमान,एकात्मता समजावून दिली. यावेळी महेंद्र अकॅडमी येथील महेंद्र पेडणेकर, पोलीस हवलदार श्री. निरवडेकर, प्राचार्य नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे येथील प्राचार्य श्रीमती बोवलेकर आणि शिक्षक वर्ग उपस्थित राहिले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांचे सूचनेप्रमाणे, पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती. संध्या गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.