
कणकवली : कणकवली शहरातील 90 बचतगतांना कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांच्यावतीने कृषी विषयक मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी छोटे-मोठे व्यवसाय करून आपली आर्थिक उन्नती व विकास कसा करावा या विषयी शहरातील 90 बचतगटाच्या अध्यक्षा व महिला प्रतिनिधिंना मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र किर्लोस च्या वतीने काजरेकर, आनंद सावंत व बांबूलकर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचे आयोजन सुशांत नाईक यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी नाईक यांनी पण मार्गदर्शन करताना शहरातील बचतगतांना याचा लाभ होईल असा विश्वास देखील व्यक्त केला. या कृषी विज्ञान केंद्राच्या "स्मृती प्रोजेक्ट चा" जास्तीत जास्त लाभ शहरातील महिला बचतगटांना कसा होईल व त्यांची आर्थिक उन्नती कशी होईल याचा लाभ शहरातील महिला बचतगटांनी घ्यावा व त्यांच्या मार्गदर्शन मिटिंग अटेंड करून अधिक लाभ कसा मिळेल या दृष्टीने मार्गदर्शन नाईक यांनी केले.
यावेळी नीलम सावंत यांनी ही महिलांनी कस सक्षम व्हावे या बद्दल मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घेण्यात आला होता यावेळी गौरव हर्णे, साक्षी आमडोस्कर, दिव्या साळगावकर व शहरातील बचतगटांच्या अध्यक्षा व महिला प्रतिनिधी उपस्थित होते.