प्रसिद्ध युवा व्याख्याता सत्यवान रेडकर यांचे स्पर्धा परीक्षे संदर्भात मार्गदर्शन

बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ४ एप्रिला नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षांचे करणार मार्गदर्शन
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 03, 2023 18:56 PM
views 222  views

कणकवली : शासकीय स्पर्धा परीक्षा संदर्भात संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात आपल्या व्याख्यानाचे वादळ निर्माण करणारे, अविरतपणे शैक्षणिक ज्ञानदान करणारे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र माननीय सत्यवान यशवंत रेडकर हे तिमिरातुनी तेजाकडे सामाजिक संस्थेतर्फे, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आयोजित करत आहेत. भविष्यातील अधिकारी घडविण्यासाठी या ज्ञानवर्धक शैक्षणिक व्याख्यानमालेचे मंगळवार ,दिनांक ४ एप्रिल २०२३ रोजी. बाल शिवाजी इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये सकाळी ठीक ९ वाजता, इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी या व्याख्यानमालेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या सचिव सुलेखा राणे यांनी केले आहे. 

या व्याख्यानासाठी विद्यार्थ्यांना वही व पेन घेऊन बसणे बंधनकारक आहे. सर्व पालकांना सुद्धा या व्याख्यानाचा लाभ घेता येईल व त्यांना त्याचे महत्त्व कळू शकेल. तरी आपण या व्याख्यानमालेसाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन बाल शिवाजी इंग्लिश मीडियम च्या वतीने करण्यात आले आहे