सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये 'सजग पालकत्व' सभेतंर्गत मार्गदर्शन

मान्यवरांनी दिला मौलिक सल्ला
Edited by: विनायक गांवस
Published on: December 16, 2022 16:23 PM
views 172  views

सावंतवाडी : येथील सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये बॅ. नाथ पै . सेवांगण , मालवण आणि आम्ही भारतीय संस्थेतर्फे 'सजग पालकत्व' सभा घेण्यात आली. या सभेतंर्गत इ. ८ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांच्या पालकांना मान्यवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ॲड. संदीप  निंबाळकर , लेखक व  मानसोपचार तज्ज्ञ  डॉ. रुपेश पाटकर, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक आदी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले मान्यवर उपस्थित होते. 

तसेच सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेच्या उपाध्यक्षा निलोफर बेग, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक - शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे इ. ९ वीचे प्रतिनिधी जास्मीन पटेल व इ. व १० वीचे प्रतिनिधी आमिर मालिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ यांनी गुलाबपुष्प देऊन  स्वागत केले.

ॲड. संदीप निंबाळकर यांनी 'सजग पालकत्व काळाची गरज' या विषयावर आपले विचार व्यक्त केले. तसेच डॉ. विजयालक्ष्मी  चिंडक यांनी पालक व मुलांमध्ये सुसंवाद असावा, असे मत व्यक्त केले. 

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना मुलांना सहनशीलता आणि संयम, विश्वास आणि संस्कार याविषयीचे योग्य वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे . त्याचप्रमाणे  पालकांनी मुलांना कोणतीही गोष्ट सहज उपलब्ध करून देऊ नये, असे आग्रही मत मांडले. पालकांनीही प्रशालेच्या मुख्याध्यापकांकडे विद्यार्थ्यांसाठीही अशाप्रकारचे चर्चासत्र आयोजित करावे, अशी विनंती केली. शेवटी उपस्थित मान्यवरांचे प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका मारिया पिंटो यांनी आभार मानले.