
सिंधुदुर्ग : देवबागसह सिंधुदुर्गात वारंवार विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. भारनीयमन आहे की अन्य याबाबत आमदार वैभव नाईक यांनी लक्ष वेधले. देवबाग येथे तर हा रोजचाच प्रश्न निर्माण झाल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विज वितरणचे अधीक्षक अभियंता पाटील यांच्याकडून आढावा घेतला. यावर पाटील यांनी देवबागला ट्रान्सफार्मरची गरज असल्याचे सांगितले. मात्र, प्रश्न एक आणि उत्तर भलतंच देणाऱ्या पाटील यांना विसंगत उत्तर देऊ नका असे सांगत सुनावले.










