
मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण 19 व 20 रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. बुधवार दिनांक 19 रोजी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी त्यांचे गोवा चिपी विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर ते सावंतवाडीकडे प्रयाण करतील. सायंकाळी सहा वाजता सावंतवाडी येथे आगमन आणि महाविजय अभियान 2024 समारोप कार्यक्रम तसेच कोलगाव ग्रामपंचायत मोबाईल ॲपचे लोकार्पण करतील. सायंकाळी सात वाजता सावंतवाडी येथून कासार्डे तिठाकडे प्रयाण करतील. आठ वाजता कासार्डे तिठा येथे आगमन व माजी आमदार प्रमोद जठार यांच्या 58 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यास ते उपस्थित राहतील.