
कणकवली : गेले १५ वर्षे सत्तेत असलेले भाजपा,शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी या चारही पक्षांच्या नेत्यांनी जिल्ह्यातील जनतेला फसवले आहेत.चीपी विमानतळ आणलं या श्रेयासाठी मी केलं असे करत होते. त्यावेळी केसरकरांनी गणपती विमानातून आणला तर राणेंनी गाजावाजा केला.तसेच शिवसेना खा. राऊतानी,आ.नाईकांनी मी विमानतळासाठी काय केले? हे सगण्याचा प्रयत्न केला.मात्र,सद्या वाहतूक ठप्प झाल्यावर श्रेय घेणारे कुठे गेलेत? असा सवाल करतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री हेच बांधकाम मंत्री चव्हाण असताना जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते,राज्य मार्ग व अन्य रस्त्यांवर खड्डे आहेत.त्या खड्ड्यांमधूनच प्रवास गणपती बाप्पाला करावा लागणार असल्याची टीका मनसे सरचिटणीस परशुराम यांनी केली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.
चिपी विमानतळावर माजी पालकमंत्री केसरकरांनी गणपती आणत पूजा करुन गणेशोत्सव काळात दिखावा केला. त्यानंतर राणेंनी मी केलं सांगितले. शिवसेना नेत्यांनी तसाच आव आणला. आताचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी गणेशोत्सव काळापासून कायमस्वरूपी विमान सेवा सुरु करतो असे सांगितले होते. त्या चाकरमान्यांना आता एका हॉटेल मध्ये ठेवावे लागले. हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याचे टीका परशुराम उपरकर यांनी केली.
कोकणी माणसाला प्रत्येक गोष्टीत पालकमंत्र्यांनी फसवले आहेत. जनतेला फसवण्याचे काम स्थानिक खासदार आणि आमदार करताहेत. पालकमंत्र्यांनी रेल्वे सुशोभिकरण करण्यासाठी पुण्याचे ठेकेदार आणले. मात्र,पालकमंत्री चाकरमानी न भिजता आणण्याचे बोलत होते, ते निवारा शेड देखील केले नाहीत.जिल्ह्यातील रस्ते खराब झाले आहेत. हे आम्ही सांगत नाही तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी २० कोटी रुपयांची मागणी करत सांगितले आहे. ते पैसे देखील पालकमंत्री जिल्ह्यातील ७० कोटी विकास ठेकेदारांचे बाकी आहेत.जनतेला आणि गणेश भक्तांना खड्ड्यातूनच बाप्पाला आणावे लागणार आहे. गेल्या पंधरा वर्षांनंतरही राज्य,जिल्हा,ग्रामीण मार्ग खड्डेमय झाल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला आहे.
पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात लक्ष नाही. सर्वच शासकीय विभागांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचन राहिलेला नाही काही अधिकारी कामांवर दुर्लक्ष करत आहेत पालकमंत्री जनतेच्या हितासाठी काम करणार की स्वतःच्या फायद्यासाठी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपावाले पालकमंत्र्यांचा व्हिडिओ फिरवतात,विकासासाच्या आड येणाऱ्या लोकांना मी पाहून घेतो.पण आम्ही विकास करा,असे सांगतो .मग विकासाला खील कशाला? असा सवाल परशुराम उपरकर यांनी केला आहे.